IRCTC Tour Packages | दक्षिण भारत हा भारताचा असा भाग आहे जे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र मानले जाते. अथांग समुंद्रकिनारा, सर्वत्र हिरवळीचा निसर्ग आणि अतिशय सुरेख अशी मंदिरे यामुळे दक्षिण भारतात सफर करणे हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. परंतु कधी कधी आर्थिक अडचणीमुळे इतका सगळा प्रवास करणं अनेकांना शक्य होत नाही आणि आपण आपला प्लॅन रद्द करतो. पण ह्यावेळी असं होणार नाही. कारण ह्यावेळी IRCTC तुमच्यासाठी केवळ 21 हजारात दक्षिण भारताची सैर घेऊन आले आहे. हे पॅकेज नेमकं किती दिवसांचे आहे? तसेच या पॅकेज अंतर्गत तुम्ही कोणकोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकता हेच आज आपण जाणून घेऊयात.
भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे केली जाणार सफर- IRCTC Tour Packages
दक्षिण भारताची ही टूर IRCTC द्वारे आयोजित करण्यात आली असून भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे केली जाणार आहे. 25 ऑक्टोबर 2023 पासून गोड्डा येथून या प्रवासाला सुरुवात होईल आणि 5 नोव्हेंबर ला तुम्ही परत गोड्डाला परत याल म्हणजेच संपूर्ण प्रवास हा 12 दिवस व 11 रात्रीचा असेल. IRCTC च्या या पॅकेज (IRCTC Tour Packages) अंतर्गत तुम्ही तिरुपती येथील तिरुपती बालाजी मंदिर, मदुराई येथील मीनाक्षी अमन मंदिर, रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिर, कन्याकुमारी येथील कन्याकुमारी मंदिर, विवेकानंद रॉक आणि त्रिवेंद्रम येथील श्री पद्मनस्वामी मंदिर या पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकता. तुम्ही गौरव टुरिस्ट ट्रेन मध्ये गोड्डा, भागलपुर, कहलगांव, साहिबगंज, बरहरवा, पाकुड़, रामपुर हाट, बोलपुर शांतिनिकेतन, बर्धमान, कोलकाता, खड़गपुर, बालासोर, भद्रक, कटक, भुवनेश्वर, खुर्दा रोड स्टेशन वरून देखील आपल्या प्रवासाला सुरुवात करू शकता.
प्रवासासाठी किती रक्कम मोजावी लागेल
IRCTC च्या दक्षिण भारताच्या टूरचे (IRCTC Tour Packages) पॅकेजचे भाडे 21,300 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होते. जर तुम्ही इकॉनॉमी कॅटेगरी अंतर्गत बुकिंग केले तर तुम्हाला प्रति व्यक्ती 21,300 रुपये खर्च करावे लागतील. स्टॅंडर्ड श्रेणी अंतर्गत बुकिंगसाठी, तुम्हाला प्रति व्यक्ती 33,300 रुपये खर्च करावे लागतील. तर, सर्वात वरच्या श्रेणी अंतर्गत बुकिंगसाठी, तुम्हाला प्रति व्यक्ती 36,400 रुपये खर्च करावे लागतील.