IRCTC Website Down : रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुकिंग 10 तासांपासून बंद; प्रवाशांची मोठी गैरसोय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IRCTC Website Down भारतीय रेल्वेचे बुकिंग करणाऱ्या प्रवासासाठी नुकतीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेचे बुकिंग ज्या वेबसाईटवरून करण्यात येते ती आयआरसीटीसी साईड काही तांत्रिक कारणामुळे गेल्या १० तासांपासून बंद पडली आहे. तसेच रेल्वे विभागाच्या सेवा देखील पूर्णपणे बंद झाली आहे. याची माहिती रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून देण्यात आली आहे. सध्या रेल्वेची टेक्निकल टीम या समस्येचे निराकरण करत असून लवकरच बुकिंग वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात येईल. तोपर्यंत मात्र प्रवाशांना वाट पहावी लागणार आहे.

ट्विट करत दिली माहिती – (IRCTC Website Down)

गेल्या १० तासांपासून बुकिंग करण्यात येणारी वेबसाईट बंद (IRCTC Website Down) आहे. यासंदर्भात अनेक प्रवाशांनी रेल्वे विभागाकडे याची तक्रार देखील केली आहे. मात्र टेक्निकल समस्येमुळे ही अडचण निर्माण झाल्याची माहिती विभागाने दिली आहे. तसेच आपल्या ट्विटमध्ये याबाबत माहिती देत म्हंटल आहे कि, आमची तांत्रिक टीम समस्येचे निराकरण करत असून, तांत्रिक समस्या दूर होताच आम्ही सूचित करू. तो पर्यंत प्रवासी Amazon, Makemytrip इत्यादी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरून आपल्या तिकीटे बुक करू शकतात. रेल्वे कडून ही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्याचबरोबर, रेल्वेच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन विभागाने रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त/अतिरिक्त PRS तिकीट खिडक्या ओपन केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

दरम्यान भारतीय रेल्वे विभागाकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन बुकिंगची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रोज कित्येक प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपल्या तिकीट बुक करत असतात. मात्र आता याच वेबसाईटवर तांत्रिक बिघाड (IRCTC Website Down)  दाखवण्यात येत आहे. त्यामुळे तात्काळ प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.