इस्लामाबाद । पाकिस्तानच्या उत्तरी प्रांतातील खैबर पख्तूनख्वा येथे दासू धरण बांधणारी चिनी कंपनी CGGC ने शनिवारी बस स्फोटात आपल्या इंजिनिअर्सचा मृत्यू झाल्यानंतर धरणाचे बांधकाम स्थगित करण्याची घोषणा केली. बुधवारी, खैबर पख्तूनख्वा येथे प्रवासी बसमध्ये झालेल्या स्फोटात नऊ चिनी इंजिनिअर्ससह 13 जण ठार तर अनेकजण जखमी झाले. अप्पर कोहिस्तान जिल्ह्यात ही बस दासू शहराकडे जात असताना ही घटना घडली. ठार झालेल्यांमध्ये फ्रंटियर कॉरचे दोन कर्मचारी आणि एक बस चालकही होते.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “14 जुलै रोजी बसमध्ये झालेल्या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती, CGGC दासू HPP मॅनेजमेन्टला दासू जलविद्युत प्रकल्प बांधकाम पुढे ढकलण्यास भाग पाडले जात आहे.” 60 अब्ज डॉलर्सच्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा भाग म्हणून दासुजवळ सिंधू नदीवर जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा विचार आहे.
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अप्पर कोहकिस्तान जिल्ह्यातील दासू भागात ही घटना घडली, ज्यात 9 चिनी नागरिकांसह 13 लोकं ठार झाले. चिनी इंजिनिअर्स आणि कामगारांच्या मदतीने हे धरण बांधण्यात येत आहे. हे धरण 60 अब्ज डॉलरच्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरचा (CPEC) एक भाग आहे. यानंतर चीन आणि पाकिस्तान यांच्यातील एक महत्त्वाची बैठक रद्द झाल्याची माहिती चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचे प्रमुख मेजर जनरल असीम बाजवा यांनी दिली. बाजवा यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘CPEC ची ही बैठक आता ईदनंतर होईल. CPEC वर JCC -10 ची बैठक 16 जुलै 2021 रोजी होणार होती. त्यानंतर ईदनंतर तहकूब करण्यात आले. लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल. तथापि, या दरम्यान तयारी चालू आहे.’
पाकिस्तान आणि चीनसाठी CPEC का महत्त्वाचे आहे ?
2015 मध्ये सुरू झालेले CPEC हा चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) चा प्रमुख प्रकल्प आहे. यामुळे चीनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याची अपेक्षा होती, ज्यामुळे पाकिस्तानच्या लोकांना हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील. नवाज शरीफ पंतप्रधान असताना अनेक प्रकल्प पूर्णत्वास आले होते. तथापि, गंभीर आर्थिक परिस्थिती आणि नोकरशाही असहकार यामुळे इम्रान खान यांच्या सरकारने राष्ट्रीय उत्तरदायित्व ब्युरो (NAB) च्या सद्य भीतीमुळे CPEC प्रकल्प थांबवले आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा