हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर, तज्ञ, शास्त्रज्ञ आणि सरकार सर्वजण डबल मास्किंगवर जोर देत आहेत. डबल मास्किंग म्हणजे चेहर्यावरील मास्कवर दुसरा मास्क घालणे. तज्ञांच्या मते, हे केल्याने आपल्याला कोरोनापासून अधिक संरक्षण मिळते. बर्याच लोकांनीही त्याचा अवलंब करण्यास सुरवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र (सीडीसी) मास्कबाबत असेच म्हणाले होते. सीडीसीच्या मते, दोन मास्क घालणे अधिक फायदेशीर आहे. यालाच डबल मास्किंग असे नाव आहे. तज्ज्ञांच्या मते दुहेरी मास्क परिधान केल्याने शरीरात नाका आणि तोंडातून जाणाऱ्या थेंबांना 90 टक्क्यांहून अधिक रोखता येऊ शकते. मास्क परिधान करण्याबद्दल बरेच वेगवेगळे अभ्यास झाले आहेत. आणि अजूनही चालू आहेत. नुकत्याच झालेल्या अभ्यासात डबल मास्किंगचे वर्णन सुरक्षित असे केले आहे. अभ्यासात या वस्तुस्थितीचे पुरावेही सापडले आहेत.
हे निष्कर्ष आले समोर:
एका नवीन अभ्यासातून असे समोर आले आहे की, sars-cov-2 आकाराच्या कणांपासून संरक्षणासाठी दोन चांगले फिटिंग केलेले फेस मास्क दुप्पट प्रभावी आहेत. हे विषाणू किंवा थेंब त्या व्यक्तीच्या नाका तोंडापर्यंत पोहोचण्यापासून रोखले जातात ज्यामुळे ती व्यक्ती संक्रमणापासून सुरक्षित असते. जर्नल जेएएमए इंटरनल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, कापडाचे दोन थर असल्यामुळे विषाणू पासून बचाव होत नाही परंतु कोणताही भाग उघडा राहत नाही आणि खराब फिटिंग्जचे भाग देखील सुरक्षित राहतात म्हणून विषाणूपासून बचाव होतो.
तज्ञ काय म्हणतात:
अमेरिकेतील कॅरोलिना विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक एमिली सिकबर्ट म्हणाले, “वैद्यकीय प्रक्रियेमध्ये वापरलेले मास्क अशा प्रकारे तयार केले जातात की त्यात हवेचे वाहन योग्य प्रकारे होते परंतु ते चेहऱ्यावर व्यवस्थित बसत नाहीत.” संशोधकांच्या एका पथकाने एका यंत्राच्या मदतीने मीठाचे छोटे कण वेगवेगळ्या मास्कांमधील फिटेड फिल्टरेशन इफिसियंसी (एफएफई) शोधण्यासाठी डिव्हाइसच्या मदतीने पाठविले. संशोधकांनी वेगवेगळे मास्क परिधान करून हे माहीत केले की, श्वास घेण्याच्या जागेपासून ह्या कणांना दूर ठेवण्यात मास्क किती प्रभावी आहेत.