हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हाट्सअँप हे जबरदस्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. व्हाट्सअँप द्वारे आपण आपल्या ओळखीच्या लोकांशी संपर्क साधू शकतो, व्हिडिओ, फोटो शेअर करू शकतो आणि मनसोक्त गप्पाही मारू शकतो. अलीकडेच व्हॉट्सअॅपने लिंक्ड डिव्हाइस फीचर्स सादर केले आहे, ज्यामुळे यूजर्स एकाच वेळी 4 डिव्हाइसेस लिंक करू शकतात परंतु समजा, या लिंक्ड डिव्हाईस फीचर्स मुळे जर कोणी तुमच्यावर लक्ष ठेवून असेल किंवा तुमचे मेसेज वाचत असेल तर? असे अनेक लोकांसोबत घडले आहे आणि तुम्हीही त्याचा बळी होऊ शकता.
व्हॉट्सअॅपला दुसऱ्या डिव्हाइसशी लिंक करण्यासाठी काही सेकंद लागतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमचा फोन एखाद्या मित्राकडे, नातेवाईकाकडे काही वेळेसाठी दिला तर कोणीतरी तुमच्या व्हॉट्सअॅप वेबवर किंवा इतर डिव्हाइसवर लॉग इन करून तुमच्या सर्व चॅट्स वाचू शकेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा व्हॉट्सअॅप मेसेज कोणीतरी वाचत असेल तर तुम्ही सहज शोधू शकता. कसे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हे सेटिंग तपासा-
आता आपण याविषयी बोलूया की एखाद्याने आपल्या खात्यात लॉग इन केले नाही का ते आपण कसे तपासू शकता?
1) यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल.
2) येथे तुम्हाला Linked Device चा पर्याय मिळेल.
3) या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्हाला तुमचे अकाउंट लॉग-इन केलेल्या सर्व डिवाइस ची माहिती मिळेल.
4) जर तुम्हाला एखादे अज्ञात डिवाइस दिसले, तर तुम्ही तेथून काढू शकता.




