कराड | पाटण तालुक्यात छ. संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास मोराणा विभाग व परिसरातील लोकांनी भव्य प्रतिसाद दिला. महाराष्ट्र शासनाने 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांसाठी लसीकरणाच्या निर्णय घेतला आहे. लसीकरण झाल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदू एकता आंदोलन सातारा जिल्हा प्रमुख विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली व हिंदू एकता तालुका अध्यक्ष गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनात खाली रक्तदान शिबीर आयोजित केले. यावेळेस प्रशांत चोपदार, ओंकार प्रभाळे, सोमनाथ हिरवे, अतुल हिरवे, प्रसाद अवसरे, नरेन नाझरे, अक्षय हिरवे , प्रणील शिंदे, कल्पेश हिरवे, अथर्व हिरवे, शुभम नाझरे, अभिषेक हिरवे, महेश फुटाणे, यशराज हिरवे, नामदेव नाझरे,हेमंत फुटाणे, गौरव हिरवे, प्रनील प्रभाळे, निलेश हिरवे, शुभम प्रभाळे, उदय प्रभाळे, वेदांत डांगे यांनी रक्तदान केले. तसेच रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
गणेश पाटील म्हणाले, हिंदू एकताच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम राबविले जात असतात. कोरोनाच्या काळातही आमचे सहकारी काम करत आहेत. आताचा काळात समाजाला मदतीची गरज आहे, त्याची जाणीव ठेवून जिल्हा प्रमुख विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे.