वडिलांच्या निधनानंतर व्यक्त झाला टप्पू; सोनू सूदचे आभार मानत लोकांना केले हे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील टप्पू म्हणजेच भव्य गांधीच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर एक पोस्ट करीत तो व्यक्त झाला आहे. या पोस्टमध्ये त्याने अभिनेता सोनू सूदसोबत वडिलांच्या उपचारासाठी मदत केलेल्या नर्स आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सोबतच त्याने लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नका आणि लस घ्या असे आवाहन केले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करीत त्याच्या दुःखात सहभागी होऊन त्याला आधार दिला आहे.

https://www.instagram.com/p/CO0XrQoHQht/?utm_source=ig_web_copy_link

भव्यने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझ्या वडिलांना ९ एप्रिल रोजी कोरोना झाला. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना डॉंक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. कोरोनावर मात करण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले. माझ्या आयुष्यात जे काही चांगले झाले आहे, त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या वडिलांना जाते.’त्याने पुढे लिहिले की, ‘मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो लसीकरण करून घ्या. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जीवघेण्या व्हायरसवर मात करण्यासाठी हाच एक पर्याय आहे.’

https://www.instagram.com/p/CJGKtlAH5jY/?utm_source=ig_web_copy_link

पुढे म्हणाला, ‘मी सर्व डॉक्टर, नर्स आणि सर्व रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. ज्याठिकाणी माझे वडील दाखल होते. सोनू सूद सरांचे देखील आभार. मला माहित आहे पापा तुम्ही आहात त्याठिकाणी आनंदी आहात. मला सगळे काही शिकवण्यासाठी आभार. लव्ह यू पापा…’वडिलांना कोरोना झाल्यावर त्यांच्या उपचारासाठी गांधी कुटुंबाला अक्षरशः वणवण भटकावे लागले. खूप प्रयत्नानंतर अखेर त्यांना कोकिलाबेन रूग्णालयात त्यांना बेड मिळाला. पण ११ मे २०२१ रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Leave a Comment