Saturday, March 25, 2023

आदित्य ठाकरेंना आलेली धमकी हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र आहे का? शिवसेनेने उपस्थित केलं कर्नाटक कनेक्शन

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे याना जीवे मारण्याची धमकी देणार्याला कर्नाटक येथून अटक करण्यात आल्यानंतर शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी शंका व्यक्त करत या सर्व घटना भाजपशासित कर्नाटक मधूनच का होतात असा प्रश्न उपस्थित केला. दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश, आणि कलबुर्गी यांच्या हत्येचं नेमकं कर्नाटक कनेक्शन काय आहे असा सवाल त्यांनी केला.

- Advertisement -

कर्नाटक मध्ये भाजप सरकार आहे त्यामुळे या हत्या करणाऱ्यांच्या पाठीशी कोणतं सरकार आणि कोणती संस्था आहे याची माहिती मिळन आवश्यक आहे असे सुनील प्रभू यांनी म्हंटल. आदित्य ठाकरेंना आलेली धमकी, त्यानंतर पोलिसांनी दिलेले पुरावे आणि त्यांनतर झालेली अटक या सर्व प्रकरणाचा कर्नाटकशीच संबंध कसा काय असा सवाल त्यांनी केला

दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश, आणि कलबुर्गी यांची हत्या करणारा कर्नाटक मध्ये आहे तसेच आदित्य ठाकरे याना धमकी देणारा सुद्धा कर्नाटकचा कसा असा संशय व्यक्त करत हे सर्व जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र आहे का असे म्हणत सुनील प्रभू यांनी सर्व घटनेचा निषेध केला