व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ICSE बोर्डाच्या परीक्षेलाही पालकांचा विरोध

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना CBSE आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा जुलै महिन्यात होऊ घातल्या आहेत. या परीक्षांना पालकांना मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे. शुक्रवारी १२ जून रोजी सकाळी ट्विटरवर या परीक्षा घेण्याविरोधात ही मोहिम सुरू झाली. #Cancel10thICSEboards या हॅशटॅगसह सुमारे २८ हजार टि्वटर मेन्शन होते. एक ते दीड तास हा हॅशटॅग ट्रेंड करत होता

ICSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या पालक असलेल्या सहा महिलांनी ही मोहिम सुरू केली आहे. या सहाही पालक दिल्लीतील आहेत. त्यांच्या मोहिमेला मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळत आहे. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा १ ते १४ जुलै या कालावधीत होणार आहेत.या सहा महिला पालकांनी या मोहिमेच्या समर्थनार्थ व्हॉट्स अप ग्रुप तयार केले. काही तासांत २३०० हून अधिक पालक या ग्रुपमध्ये जॉइन झाले. पाल्यांच्या आरोग्याची काळजी असल्याने परीक्षांना विरोध करत असल्याचे या पालकांचे म्हणणे आहे.

१९ मार्च २०२० रोजी ICSE बोर्डाने सर्व परीक्षा स्थगित केल्या. त्यावेळी दहावीचे ६ विषयांचे पेपर शिल्लक होते (ही संख्या विद्यार्थ्यांगणिक बदलू शकते कारण विविध विद्यार्थी विविध विषय निवडतात.) त्यावेळी देशभरात कोरोना संक्रमणाच्या २३६ केसेस होत्या. आता देशभरात सुमारे ३ लाख कोरोनाबाधित झालेले रुग्ण आहेत. आणि अशा वेळी बोर्डाने सांगितले आहे की उर्वरित विषयांच्या परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या २ आठवड्यात घेतल्या जाणार असल्याच्या आमच्या मुलांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे असं या पालकांच म्हणणं आहे.

दरम्यान, CBSE दहावी, बारावीच्या परीक्षांनाही पालकांचा विरोध आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा येत्या १ ते १५ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. यापैकी सीबीएसई बारावीच्या परीक्षा देशभर होणार आहेत. या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आता पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देशभरात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत अशी पालकांची मागणी आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in