खळबळजनक!! पुण्यात ISIS संबंधित व्यक्ती? एनआयएने घेतले ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील एका दाम्पत्याचा आयसीससोबत संबंध असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. कोंढवा भागातील तल्हा खान नावाच्या 38 वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा टाकून इस्लामिक स्टेटशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल साहित्य जप्त केलं आहे. यानंतर पोलिसांनी संशयित जोडप्याला आज अटक केली आहे.

या प्रकरणात आधीच चार जणांना अटक करण्यात आलीय. तल्हा खान हा अटक केलेल्या चार जणांपैकी नबील सिद्दीक खत्रीच्या संपर्कात होता. मार्च २०२० मध्ये दिल्लीतील लोधी कॉलीनी पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. काश्मीरमधील एक पती-पत्नीचं जोडपं आयसिससाठी तरुणांना काम करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा खुलासा मागील वर्षी झाला होता.

या दोघांना अटक करुन चौकशी केली असता पुण्यातील एक मुलगी या दोघांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली. याच मुलीच्या संपर्कात नबील सिद्दीक खत्री होता. तर तल्हा खानही खत्रीच्या संपर्कात होता असं आता समोर आलं आहे. त्याच आधारे त्याला एनआयएने ताब्यात घेतलंय. या चौकशीमधून आणखी काही लोकांपर्यंत एनआयए पोहचू शकते अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.

या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून ISIS ची विचारसरणी पसरवण्याचा कट रचणे, ISIS साठी काम करण्यासाठी सेल स्थापन करणे, निधी उभारणे, शस्त्रे गोळा करणे, आयईडी बनवणे आणि टार्गेट करुन हत्या करणे, यांसारखे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

Leave a Comment