सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
मी माझं मत सांगतो, मी व्यापारी असतो तर जग इकडचे- तिकडे झाले असते, तरी दुकान बंद ठेवले नसते. एक तर कामगारांचे पगार द्यायचे कुठुन, कर्ज फेडायचे कसे, त्यात कुटुबांची देखरेख करायची कशातनं. महिना, पंधरा दिवस समजू शकलो असतो, मात्र पुढे काय व्यापाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहेच ना. लाॅकडाऊन सोल्युशन नाही, असे खासदार छ. उदयनराजे भोसले म्हणाले.
जिल्ह्यात सध्या व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी नाही, याविषयी छ. उदयनराजे भोसले पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, शनिवार व रविवार लाॅकडाऊन कशाकरता, या दिवशी कोरोना नसणार आहे का तसा संशोधन असेल तर आम्हांला कळू द्या. त्यांची काॅफी तरी द्या. शासनाने जे काही निर्बंध घालून दिले आहेत, ते बोलणं सोप्प आहे. कोरोना व्हायरसं लाॅकडाऊनमुळे जाणार नाही.
लोकांनी तुमचं ऐकलं, आता त्यांची मानसिकता नाही. व्यापारी, दुकानदारांनी कामगारांचे पगार भागावायचे कुठुन. मी मेडिकल स्टुडंट नसलो मला काॅमनसेन्स आहे. कामगारांनी लस घेतली तरी दुकान उघडायला परवानगी देत नाही.