महिंद्रा ऑफर! आपल्या जुन्या कारला स्क्रॅप करुन कोणत्याही डीलरशिपकडून अगदी नवीन कार विकत घ्या, यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपणही आपल्या जुन्या कारमुळे नाराज आहात, किंवा कंटाळा आला असेल तर आपल्याला ती बदलण्याची उत्तम संधी आहे. आपली जुनी कार बदलून आपण अगदी ब्रँड न्यू कार (New vehicle) खरेदी करू शकता. खरं तर, भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल निर्माता महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra- M&M) आपली जुनी स्क्रॅप किंवा एक्सचेंजच्या बदल्यात नवीन कार खरेदी करण्याची संधी देत ​​आहेत. कंपनीने यासाठी एमएसटीसी रीसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड (MMRPL) सह करार केला आहे.

कार मालकांना फायदा होईल
वाहनांच्या स्क्रॅपिंगसंबंधी हा एकमेव करार आहे, ज्यामध्ये कार मालकांची कमाई होणार आहे. MMRPL ने ग्रेटर नोएडामध्ये CERO च्या नावाखाली जानेवारी 2018 मध्ये देशातील पहिले ऑटोमोटिव्ह आणि स्टील रीसायकलिंग युनिटची स्थापना केली.

यासाठीची संपूर्ण प्रक्रिया काय आहे जाणून घ्या
पहिले आपल्या जुन्या वाहनाचे मूल्यांकन केले जाईल. यावरुन वाहनाची स्थिती आणि तिची किंमत निश्चित केली जाईल.

यानंतर, कारची एक्सचेंज/ स्क्रॅप करण्यासाठी वाजवी किंमतीचा कोट तयार केला जाईल. यामध्ये वाहन उचलणे, ट्रांसपोर्टेशन आणि CERO स्क्रॅयपार्डकडे नेणे इत्यादींची संपूर्ण माहिती दिली जाईल.

अंतिम टप्प्यात, CERO द्वारे डिस्ट्रक्शन सर्टिफिकेट दिले जाईल. या सर्टिफिकेटद्वारे आपल्याला व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीचे काही फायदे मिळतील.

या सुविधा डीलरशिपवर उपलब्ध असतील
कार मालक आपली जुनी कार एक्सचेंज करुन किंवा स्क्रॅप करून महिंद्राची नवीन कार खरेदी करू शकतात. कार मालक 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या कारला स्क्रॅप करु शकतात. आपल्याला ही ऑफर कोणत्याही महिंद्रा डीलरशिपवर मिळेल. गेल्या महिन्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी स्क्रॅपेज पॉलिसी (scrappage policy)जाहीर केले. या पॉलिसी मागील सरकारचे उद्दीष्ट म्हणजे देशात अशा वाहनांची इको-सिस्टम तयार करणे, ज्यामुळे वायू प्रदूषण कमी होऊ शकेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment