‘या’ राज्याचे मुख्यमंत्री दोन मे नंतर बदलणार ! भाजपा नेत्याची भविष्यवाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार व भाजपामध्ये जोरदारपणे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. कोरोना लसीचा तुटवडा, परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरण, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रकरण यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले असल्याचे आरोप भाजपकडून केले जात आहेत. भाजपाच्या काही नेत्यांनी तर महाविकास आघाडी सरकारमधील काही नेते अजून काही प्रकरणात अडकणार असल्याची भविष्यवाणी केली जात आहे. महाराष्ट्र राज्याबाहेरही काही इतर राज्यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये मुख्यमंत्रीही बदलाबाबत भविष्यवाणी केली जात आहे. याचेच उदाहरण द्यायचे झाले तर ‘येडियुप्पा सरकार 2 मे नंतर कधीही जाणार’ अशी भविष्यवाणी माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदार बसवनगौडा पाटील यंताळ यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा यांच्याबद्दल भाजपामध्येच असंतोष वाढत चालला आहे. ‘येडियुप्पा सरकार 2 मे नंतर कधीही जाणार’ अशी भविष्यवाणी माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदार बसवनगौडा पाटील यंताळ  यांनी केली आहे. “सध्या अनेक मंत्री आणि आमदारांना मुख्यमंत्र्याच्या बाजूनं मीडियासमोर बोलण्याची बळजबरी केली जात आहे. या परिस्थितीमध्ये 17 एप्रिलनंतर बदल होईल,” असा दावा येडियुरप्पा यांचे कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या पाटील यांनी केला आहे.

“काही जण आकाशात चंद्र आणि सूर्य असेपर्यंत येडियुरप्पा मुख्यमंत्री असतील असा दावा करत आहेत. हे कसं शक्य आहे? येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदीपदाचा दोन वर्षांचा बोनस मिळाला आहे. त्यांनी याबाबत पक्षाचे हायकमांड आणि कार्यकर्त्यांचे आभार मानावेत आणि 17 एप्रिलनंतर स्वत:हून निवृत्त व्हावं.” अशी मागणी त्यांनी केली आहे. ” 2 मे नंतर कधीही बदल होईल. उत्तर कर्नाटकामधील नेता राज्याचा मुख्यमंत्री होईल, ” असा दावाही पाटील यांनी केला. बेळगाव लोकसभा तसंच मस्की आणि बसवकल्याण विधानसभा मतदारसंघामध्ये 17 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागेल. त्याचबरोबर पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकातील मुख्यमंत्री बदल 2 मे नंतर होईल असा पाटील यांचा दावा आहे. विजापूर शहराचे आमदार असलेल्या पाटील यांनी यापूर्वी देखील अनेकदा येडियुरप्पा यांच्यावर टीका केली आहे.

Leave a Comment