केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा ‘सामना’चा संपादक असणं माझ्यासाठी महत्वाचं- संजय राऊत

0
26
sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणं महत्वाचं होतं, असं विधान शिवसेना खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केलंय. ते आज पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते. बदलत्या परिस्थितीत प्रसार माध्यमांपुढील आव्हाने या विषयावर राऊत यांनी आपली भूमिका मांडली.

राऊत म्हणाले, मी संपादक झालो तेव्हापर्यत कधीच अग्रलेख कधीच लिहला नव्हता. सामान्य माणसाची व्यथा मांडतो म्हणजे राजकारणच आहे. कुमार केतकर हे बाहेर भूमिका मांडूनच राज्यसभेत गेले. पण ते तिकडे गेल्यावर सोनिया गांधी यांची भूमिका मांडताना ते दिसत नाहीत. त्यामुळे भूमिका मांडत राहील पाहिजे, जी आम्ही मांडतो, असा सल्लाही राऊतांनी केतकरांना दिलाय.

पत्रकारितेत काही पथ्य पाळली पाहिजेत. देशात जे परिवर्तन झालं ते वृत्तपत्रांनी केलं यावर मी ठाम आहे. आता अनेक आव्हानं आहेत. पत्रकारांनी राजकीय पक्षाचे अंकित होता कामा नये. पत्रकारांना चौथा स्तंभ म्हणता पण त्यांना संसदेत येण्यास नाकारलं जात आहे. यावर कुणी आवाज उठवताना दिसत नाही. यावर पत्रकारांमध्ये एकजूट हवी असे संजय राऊत यांनी म्हंटल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here