साताऱ्यात IT पार्क उभारणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

0
97
uday samant
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्यात येईल. कामगारांसाठी रुग्णालय उभारु, त्यासाठी लागणारी जागा उद्योग विभागाकडून देण्यात येईल असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र परिवारामार्फत यशोदा टेक्नीकल कॅम्पस, वाढे येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उद्योगमंत्री श्री. सामंत बोलत होते.

यावेळी उदय सामंत म्हणाले, सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्यात येईल. कामगारांसाठी रुग्णालय उभारु, त्यासाठी लागणारी जागा उद्योग विभागाकडून देण्यात येईल. सातारा एमआयडीसीसाठी पंधरा दिवसात प्रादेशिक अधिकारी देण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांना चांगले कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी स्कील सेंटरही उभारणार असल्याचे सुद्धा उदय सामंत यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, सामान्य कुटुंबातील युवकांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईच्या हाताला रोजगार देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचे उद्दीष्ट शासनाने ठेवले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम गावांगावांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. गेल्या 10 महिन्यात उद्योग विभागाने या योजनेच्या माध्यमातून 13 हजार उद्योजक उभे केले आहे. तसेच उद्योगांसाठी या काळात 550 कोटींचे अनुदान दिले आहे. यंदाच्या वर्षी किमान 25 हजार उद्योजक उभे करण्याचे उद्दीष्ट आहे.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, यशोदा टेक्नीकलचे संस्थापक अध्यक्ष दशरथ सगरे,सुशांतराज निंबाळकर,सुनीतात्या काटकर.संग्राम बर्गे.राजेंद्रसिंह यादव.उपस्थित होते.