25 वर्षांनी त्यांना मिळालं हक्काचं व्यासपीठ; कराडच्या ‘या’ महाविद्यालयाने घेतला महत्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कधी एसटी बसने तर कधी सायकलवरून महाविद्यालयात येत शिक्षण घेतलेले मित्र-मैत्रीण तब्बल 25 वर्षांनी एकत्रित आले. आणि त्यांना आपले हक्काचे व्यासपीठ मिळाले. कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात नुकताच 1996-97 च्या मराठी माध्यमाच्या विभागातीळ माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. यावेळी आपल्या विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकही भारावून गेले. या मेळाव्यात महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात 1996-97 च्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी 25 वर्षानी पार पडलेल्या स्नेह मेळाव्यास शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. तर माजी प्राचार्या प. ता. थोरात, माजी प्रचार्य बी. ए. कालेकर, विद्यमान प्राचार्य एल. बी. जाधव, प्रा. सुनील फलटणकर, प्रा. व्ही. व्ही जगदाळे, प्रा. बी. जाधव, प्रा. घोरपडे, प्रा. नागरे-पाटील, जिवाजी कांबळे, तानाजी काटकर यांनीही उपस्थिती लावली.

यावेळी प्रथम महाविद्यालयातील उपस्थीत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. दिवसभर चालेल्या कार्यक्रमात अनेक कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात आले होते. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांच्या संघाची स्थापना केली जाणार असून त्यासाठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, संस्था संस्था हवी ती मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले.

यावेळी प्रचार्य थोरात, प्राचार्य कालेकर, प्राचार्य जाधव, प्रा. फलटणकर, इंद्रजीत पाटील, सौ. दीपाली देवकर यांची मनोगते झाली. यावेळी दिवसभर फनी गेम्स झाल्या, त्यासोबत मीमीक्रीचाही कार्यक्रम पार पडला. अबुबकर सुरात यांनी सुत्रसंचालन केले. फारूक शेख यांच्या गाण्यांचा कार्यक्रम केला. तर भोईटे यांनी मीमीक्री सादर केली. महेश कुंभार यांनी आभार मानले.

अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या

तब्बल 25 वर्षांनी एकत्रीत आलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या आठवणी सांगितल्या, अनेकांची केलेल्या स्ट्रगलचे वर्णन करताना उपस्थिती मित्रांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. प्रत्येकवर्षी असाच कार्यक्रम घेवून हा संघच कॉलेजचा माजी विद्यार्थी संघ म्हणून रजीस्ट्रेशन करण्याची जबाबदारी यावेळी अवधूत कलबुर्गी यांच्याकडे देण्यावर एखमत झाले. त्याला महाविद्यालयानेही सहमती दिली.