नवी दिल्ली । जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचे असते तेव्हा तुम्ही लगेच Google ची मदत घेता. अनेक वेळा लोकं इतके सर्च करतात की, ते Google सर्चच्या टॉप लिस्टमध्ये येतात. ‘इयर इन सर्च’ रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की, कोरोना दरम्यान, कोरोना विषाणू जगभरातील सर्च लिस्टमध्ये टॉपवर आहे. मात्र जेव्हा अचानक एका शब्दाच्या सर्चमध्ये 5000% अधिक वेग दिसूल आला तर ते समजून घ्या की, ते नक्कीच काहीतरी विशेष असले पाहिजे … तर जाणून घेऊयात ते काय आहे जे संपूर्ण जगाला जाणून घ्यायचे आहे.
देशातील आणि जगातील शेअर बाजाराच्या वाढत्या ट्रेंडमुळे लोकांचाही याकडे अधिक कल आहे. 2020 मध्ये जागतिक लॉकडाऊन दरम्यान, Google वर काही ट्रेंडिंग शब्दांनी ‘FAANG स्टॉक’ या शब्दामध्ये ब्रेकआउट दिसून आला.
Google च्या मते, ब्रेकआउट म्हणजे कोणत्याही शब्दाच्या सर्चमध्ये 5,000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ. FAANG ची लोकप्रियता इतकी जास्त होती की, जगभरातील लोकांना, विशेषत: आशियातील लोकांना हे सर्वात जास्त जाणून घ्यायचे होते. FAANG मध्ये अमेरिकेतील सर्वात मोठ्या लिस्टेड कंपन्यांचा समावेश आहे आणि गुंतवणूकदारांच्या हिताच्या दृष्टीने सर्वात लोकप्रिय आहे.
FAANG म्हणजे काय ते जाणून घ्या ?
अलीकडे FAANG stocks खूप लोकप्रिय झाले आहेत आणि प्रत्येकाची आवड आहे. FAANG stocks पाच सर्वात महत्वाच्या आणि आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्सची व्याख्या करण्यासाठी वापरला जातो.
F – Facebook
A – Amazon
A – Apple
N – Netflix
G – Google
FAANG हा शब्द पहिल्यांदा 2013 मध्ये मॅड मनी जिम क्रेमरने CNBC वरील त्याच्या कार्यक्रमात वापरला होता. क्रेमरने सुरुवातीला FANG हा शब्द वापरला, पण जसजसे Apple ची लोकप्रियता वाढत गेली, तसतसा त्यात आणखी एक ‘A’ जोडला गेला आणि तो FANG वरून FAANG मध्ये बदलला गेला.
FAANG सर्वात जास्त का सर्च केले गेले ते जाणून घ्या
गेल्या वर्षी साथीच्या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये, लोकं काम आणि मनोरंजन या दोन्हीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अवलंबून होते, त्यावेळी या प्लॅटफॉर्मच्या लोकप्रियतेमध्ये वेगाने वाढ झाली होती. Amazon Prime आणि Netflix सारख्या OTT प्लॅटफॉर्मची मागणी वाढली. लोकं Google आणि Facebook वर जास्तीत जास्त वेळ घालवत होते. यामुळे या शेअर्समध्ये मोठी तेजी आली आणि गुंतवणूकदारांची वाढती संख्या या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू लागली.
भारतात FAANG इतके लोकप्रिय का झाले ते जाणून घ्या?
या कंपन्यांची वाढती लोकप्रियता त्या काळाशी जुळली जेव्हा बहुतेक भारतीय ब्रोकिंग कंपन्यांनी परदेशी ट्रेडिंग सुविधा देऊ केल्या. सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्या भारतीय गुंतवणूकदारांचे कोणत्याही मोठ्या ब्रोकिंग फर्ममध्ये ट्रेडिंग खाते आहे ते अमेरिकन बाजारपेठेत लिस्टेड शेअर्स खरेदी करू शकतात, ज्यात FAANG समाविष्ट आहे.