7 जून रोजी लाँच होणार Income Tax चे नवीन पोर्टल, आता मोबाइलद्वारेही वापरता येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अर्थ मंत्रालयाने अलीकडेच नवीन इनकम टॅक्स पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने शनिवारी सांगितले की,”7 जून रोजी इनकम टॅक्स रिटर्नसाठीचे नवीन पोर्टल ई-फाईलिंग 2.0 सुरू करेल. या नवीन पोर्टलमध्ये करदात्यांसाठी सुविधा वाढविण्याचे उद्दीष्ट आहे.

इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार आता मोबाइलद्वारे त्याचा वापर करणेही सुलभ होईल आणि त्यावर आधीच भरलेल्या इनकम टॅक्स रिटर्नचा तपशील, आयटीआर इनकम टॅक्स फॉर्म आणि साध्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. डिपार्टमेंट ने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” इनकम टॅक्स डिपार्टमेंट 7 जून 2021 रोजी नवीन ई-फाइलिंग पोर्टल http://incometax.gov.in लाँच करणार आहे. हे पोर्टल सध्याच्याhttp://incometaxindiaefiling.gov.in च्या जागी काम करेल.

डिपार्टमेंटने म्हटले आहे की,” या नवीन पोर्टलवर एक नवीन मोबाइल App देखील असेल ज्यावर करदात्यांना युझर्सच्या मॅन्युअल आणि व्हिडिओ क्लिप्सद्वारे प्रत्येक स्टेप मध्ये मार्गदर्शन मिळू शकेल.

सध्याचे पोर्टल 1 ते 6 जून दरम्यान उपलब्ध होणार नाही
“नवीन पोर्टल सुरू होण्यापूर्वी 1 ते 6 जून दरम्यान ई-फाइलिंग सर्व्हिस उपलब्ध होणार नाही,”असे इनकम टॅक्स डिपार्टमेंटने म्हटले आहे. डिपार्टमेंटने करदात्यांना सूचित केले आहे की,” जर त्यांना उत्तर किंवा सर्व्हिस मिळवायची असेल तर या तारखांपूर्वी किंवा नंतर अर्ज करा.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment