कितीही गुन्हे दाखल झाले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – खासगी कोचिंग क्लासेसकडे शॉप ऍक्टचा परवाना असल्यामुळे हा एक व्यवसाय आहे. त्यामुळे इतर व्यवसाय सुरू असताना केवळ कोचिंग क्लासेस बंद ठेवणे म्हणजे अन्यायकारक आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा अन्याय सहन केला जाणार नाही. राज्यातील 27 जिल्ह्यात नियमांचे पालन करून आम्ही ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरूच ठेवणार आहोत. क्लासेसला लटारू दरोडेखोरांसारखी वागणूक देवू नये, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र कोचिंग क्लासेस असोसिएशनचे राज्याध्यक्ष पी. एम. वाघ यांनी पत्रकार परीषदेत दिला.

14 मार्च 2020 पासून राज्यातील कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा केंद्र बंद आहेत. त्यावर अवलंबून संचालक, खासगी शिक्षक, कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळे आता जगणे शक्य नाही. जेंव्हा इतर सर्व क्षेत्र बंद होतील, तेंव्हाच क्लासेस बंद ठेवले जातील, असे वाघ यांनी सांगीतले. नववीतील अभ्यास, क्रीया विद्यार्थ्यांना अकरावी आल्यावर सुद्धा येत नाही. वर्गोन्नतीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी घसरली असताना कोचिंग क्लासेस बंद ठेवणे चुकीचे आहे. सभा, निवडणूका, मिरवणुका, मॉल, बाजारपेठेतील गर्दीतून फिरताना कोरोना होत नाही का? असा सवाल राज्य उपाध्यक्ष संदिप म्हस्के यांनी उपस्थित केला.

अवघ्या दोन महिन्यावर दहावी, बारावीच्या परीक्षा आहेत, त्यामुळे कोचिंग बंद ठेवता येणार नाही. सर्व सुचना, नियमांचे पालन करून ऑफलाईन पद्धतीने राज्यभरातील सीसीए संलग्नीत क्लासेस सुरु राहणार असल्याचे राज्यसरचिटणीस ज्ञानेश्वर ढाकणे म्हणाले. नियमावली करून क्लासेस सुरू होते. सर्व क्षेत्र सुरू आहेत तसेच क्लासेस 50 टक्के क्षमतेने सुरू राहू द्या. मनपाने दबावतंत्र वापरु नये, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

Leave a Comment