हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण असलेल्या परंतु सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल अंतर्गत (ITBP) 458 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) या पदासाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. येत्या 27 जून 2023 पासून अर्जप्रक्रिया सुरु होणार असून 27 जुलै 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पद संख्या – 458 पदे
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)
वयोमर्यादा – 21 ते 27 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज फी – Rs. 100/-
पगार किती – 21,700/- ते 69,100/- रुपये महिना
भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय?
1. सदर उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक किंवा 10 वी उत्तीर्ण असावा.
2. सदर उमेदवाराकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया –
1. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
2. शारीरिक मानक चाचणी (PST)
3. लेखी परीक्षा
4. प्रात्यक्षिक परीक्षा
5. तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (DME)/ पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा (RME).
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – recruitment.itbpolice.nic.in