नवी दिल्ली । केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR भरण्याची अंतिम मुदत वाढवू शकते. आर्थिक वर्ष 2021 साठी ITR भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. याआधी ते 31 जुलै 2021 पर्यंत दाखल करायचे होते परंतु अलीकडेच मुदत वाढवून 30 सप्टेंबर 2021 करण्यात आली. खरं तर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन पोर्टलमध्ये अगदी सुरुवातीपासूनच अनेक समस्य येत आहे.
इन्फोसिसने नवीन पोर्टल तयार केले आहे
इन्फोसिस या तंत्रज्ञान कंपनीने नवीन पोर्टल तयार केले होते. नवीन ITR वेबसाइट 7 जून रोजी लाँच करण्यात आली. पूर्वी वेबसाइटचा ऍड्रेस http://incometaxindiaefiling.gov.in होता, जो आता http://incometax.gov.inझाला आहे. पण अगदी सुरुवातीपासूनच करदात्यांना नवीन पोर्टलवर अनेक अडचणी येत होत्या.
नवीन पोर्टलवर अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत
इन्कम टॅक्स 2.0 पोर्टलमध्ये अनेक नवीन पेमेंट मेथड जोडल्या गेल्या आहेत. करदाते नेट बँकिंग, UPEI, क्रेडिट कार्ड, RTGS आणि NEFT द्वारे वेबसाइटवर पेमेंट करू शकतील, पैसे त्यांच्या खात्यातून थेट कापले जातील. या व्यतिरिक्त, इन्कम टॅक्स रिटर्नची प्रक्रिया नवीन साइटवर वेगवान होईल, जेणेकरून करदात्यांना त्वरित रिफंड मिळेल. मात्र, लॉन्च झाल्यापासूनच त्यात अनेक तांत्रिक समस्या येत आहेत.
त्रुटी दूर करण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत
इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलमधील अडथळ्यांबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोमवारी मोठा निर्णय घेतला. पोर्टलमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने 15 सप्टेंबरची मुदत निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत इन्फोसिसला ई-फायलिंग पोर्टलमधील सर्व तांत्रिक अडचणी दूर कराव्या लागतील.
त्यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत ई-पोर्टलवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले आहेत. FM सोबतच्या बैठकीत इन्फोसिसच्या सीईओनी अर्थमंत्र्यांना सांगितले की,”ते आणि त्यांची टीम ई-पोर्टलमधील त्रुटी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सुमारे 750 लोकांची टीम यावर काम करत आहे. कंपनीचे सीओओ प्रवीण राव वैयक्तिकरित्या याचे निरीक्षण करत आहेत.”