ITR Filing : CBDT ने Income Tax Return इलेक्ट्रॉनिक फायलिंगची मुदत वाढवली, शेवटची तारीख जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने इन्कम टॅक्स रिटर्नच्या इलेक्ट्रॉनिक फायलिंगची मुदत वाढवली आहे. या संदर्भात CBDT ने मंगळवारी एक परिपत्रक जारी केले. इन्कम टॅक्स फॉर्मची इलेक्ट्रॉनिक फायलिंग करताना येणाऱ्या अडचणी पाहता, इन्कम टॅक्स एक्ट, 1961 अंतर्गत काही फॉर्म भरण्याची मुदत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

याचे कारण इन्कम टॅक्स पोर्टल http://incometax.gov.in वर करदात्यांना येत असलेल्या अडचणी आहेत. CBDT ने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की,”करदाते आता 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म 15CC भरू शकतात.”

पूर्वी 15 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती
इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हे फॉर्म भरताना करदात्यांना येणाऱ्या अडचणी पाहता CBDT ने कर भरण्याच्या तारखा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. CBDT ने यापूर्वी निर्णय घेतला होता की, करदाता 15 ऑगस्ट 2021 पर्यंत अधिकृत डीलर्सकडे फॉर्म 15CA/15CB मॅन्युअल स्वरूपात सबमिट करू शकतात.

CBDT ने पुढे सांगितले की,” आता ही तारीख 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून, आता करदाते हे मॅन्युअल स्वरूपात अधिकृत डीलर्सकडे 31 ऑगस्ट 2021 पर्यंत सबमिट करू शकतात. इन्कम टॅक्स एक्ट, 1961 नुसार, फॉर्म 15CA आणि 15CB इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरावा लागतो.”

सध्या करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर फॉर्म 15 सीबीसह फॉर्म 15 CB मधील चार्टर्ड अकाउंटंट सर्टिफिकेट अपलोड करावे लागते, त्यानंतर त्याची कॉपी अधिकृत डीलरकडे जमा करावी लागते. आर्थिक वर्ष 2020-21 साठी फॉर्म क्रमांक एक मधील इक्वलायझेशन लेव्ही स्टेटमेंट, जे 30 जून, 2021 रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करणे आवश्यक होते, ते 31 ऑगस्ट, 2021 पर्यंत वाढविण्यात आले आहे.

फॉर्म II SWF देखील 31 जुलै 2021 पासून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवला
या व्यतिरिक्त, CBDT ने इतर काही फॉर्म भरण्यासाठी ई-फायलिंग करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता काही इतर फॉर्म भरण्याची मुदत वाढवली आहे. फॉर्म II SWF देखील 31 जुलै 2021 पासून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

इन्कम टॅक्सच्या नवीन पोर्टलवर येणाऱ्या समस्यांमुळे करदात्याचा त्रास वाढला आहे. नवीन पोर्टलवर टॅक्स भरताना अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत होत्या. त्यामुळे ITR भरण्यास विलंब होत आहे.

Leave a Comment