नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागल्याने त्यांच्या जागी कोण या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या नेत्यांनी एकमताने जे. पी. नड्डा यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले आहे.
J P Nadda elected as the BJP National Working President pic.twitter.com/OZxamE78QW
— ANI (@ANI) June 17, 2019
जे. पी. नड्डा हे संघ ते भाजप असा प्रवास केलेले नेते आहेत. त्यांच्या कडे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वात भाजपने उत्तर प्रदेशात चांगले यश मिळवत बूज आखली आहे. याचीच बक्षिशी म्हणून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद देण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशाचे असणारे जे. पी. नड्डा हे भाजपचे मितभाषी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक महत्वाची बाब म्हणजे अमित शहा यांच्या तोडीची रणनीती आखण्याची त्यांची बैद्धिक कुवत आहे. तसेच भाजपचे चाणक्य म्हणून त्यांचा दिल्लीच्या राजकीय वसाहतीमध्ये लौकिक आहे.