कित्येक महिन्यांपासून गायब होते जॅक मा ! आता एका चिनी बेटावर ‘नवशिक्या’ सारखे गोल्फ खेळताना दिसून आले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कित्येक महिन्यांपासून सार्वजनिक क्षेत्रात दिसला नसलेला अलिबाबा ग्रुपचे (Alibaba Group) प्रमुख असलेले जॅक मा (Jack Ma) नुकतेच गोल्फ खेळताना दिसून आले. केवळ चीनच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जॅक मा चीनच्या हेनानमधील सॅन व्हॅली गोल्फ रिसॉर्टमध्ये गोल्फ खेळताना दिसले. 20 जानेवारी रोजी चिनी माध्यमांनी व्हर्च्युअल मिटिंगचा एक व्हिडिओ प्रसारित केला होता ज्यामध्ये जॅक मा हे शेकडो ग्रामीण शिक्षकांना संबोधित करीत होते. ब्लूमबर्गने सांगितले की, जॅक मा ‘नवशिक्या’ सारखे गोल्फ खेळत आहेत. मात्र, अलीबाबा ग्रुपकडून जॅक मा बद्दल अद्याप कोणतेही विधान समोर आलेले नाही.

सहसा लोकांमध्ये अनेक वेळा दिसून येणारे जॅक मा गेले काही काळ दिसले नाही. त्यांनी एक टीव्ही मुलाखत देखील रद्द केली होती आणि सोशल मीडियावर देखील काही अपडेट केले नव्हते. यानंतर जॅक मा का गायब आहेत याविषयीची अटकळ बांधली जात होती. चीनमधील तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे श्रेय जॅक मा यांनाही दिले जाते. गेल्या काही दशकांत ते ग्लोबल बिझनेस सेलिब्रिटी म्हणून उदयास आले आहे.

20 जानेवारी रोजी चिनी सरकारी माध्यम कंपनी ग्लोबल टाईम्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात जॅक मा 100 ग्रामीण शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत आहेत. या क्लिपमध्ये ते म्हणाले, “साथीच्या रोगानंतर आपण पुन्हा एकदा भेटूयात.” तथापि CNBC ने आपल्या एका अहवालात जॅक मा हरवले नसल्याचा अंदाज वर्तविण्यास विरोध केला आणि ते जाणीवपूर्वक अंडरग्राउंड झाल्याचे म्हटले आहे.

CNBC काय दावा करीत होते?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार CNBC चे डेव्हिड फॅबर यांचे म्हणणे आहे, ‘असा अंदाज आहे की ते सीएनबीसीचे हेडक्वॉर्टर असलेल्या हँगझू येथे आहे. आपण हे विसरतो आहे की ते यापुढे अलिबाबा मॅनेजमेंटमध्ये सामील नाहीत. ते जाणूनबुजून कमी दिसत आहेत. तसेच हे आणखी काही काळ टिकेल अशी आपण अपेक्षा करू शकता. चीनी सरकारबद्दल त्यांनी भाष्य केले आहे. यापूर्वीही त्यांनी बर्‍याचदा असे केले आहे.’

अलीकडेच चीनच्या सरकारी मीडिया ने अग्रणी टेक दिग्गजांची लिस्ट जाहीर केली, ज्यामध्ये जॅक मा यांचे नाव घेण्यात आलेले नाही. या व्यतिरिक्त मा यांचे प्रतिस्पर्धी पोनी एम (Pony M) वर लेख होता. शांघाय सिक्युरिटीज न्यूजने त्याला ‘मोबाइल युगाचे पुनर्लेखन’ करण्याचे श्रेय दिले.

चिनी सरकारबद्दल केलेल्या एक निवेदनावर पडसाद उमटले
इंग्रजीचे शिक्षक असलेले जॅक मा यांनी 1999 मध्ये अलिबाबा ग्रुपची स्थापना केली. त्या काळात चीनमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती. याच्या पाच वर्षांनंतर, त्यांनी ऑनलाइन पेमेंट सर्व्हिस अलीपे (Alipay) देखील लाँच केली. या दोन्ही कंपन्या पुढील काळात वेगाने वाढल्या. तथापि, 24 ऑक्टोबर रोजी चिनी नियामकांवरील त्यांच्या एका विधानाने पारडे फिरले. त्यानंतर चिनी नियामकांनी अँट ग्रुपची (Ant Group) स्टॉक मार्केट लिस्टिंग बंद केली. हा एक ऑनलाइन फायनान्स प्लॅटफॉर्म होता. यानंतर, अलिबाबाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, त्यानंतर जॅक मा यांनी चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीची खुर्ची देखील गमावली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment