नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या अलिबाबाचे संस्थापक जॅक मा सध्या आपले छंद आणि समाज सेवेवर लक्ष केंद्रित करत आहे. अलिबाबाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि सह-संस्थापक Joe Tsai यांनी मंगळवारीएका न्यूज एजन्सीला ही माहिती दिली. गेल्या वर्षी चीनच्या नियामक यंत्रणेवर टीका केल्यानंतर चिनी सरकारने अलिबाबावर कडक कारवाई केली. यामुळे, अलिबाबाला आर्थिक व्यवसायाशी संबंधित Ant Group चा 37 अब्ज डॉलरचा इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) टाळावा लागला .
जॅक मा जास्त दिसू इच्छित नाही
तेव्हापासूनच, जॅक सार्वजनिक ठिकाणी क्वचितच पाहिले गेले आहे. Tsai म्हणाले, “त्यांना जास्त दिसण्याची इच्छा नाही. मी दररोज त्यांच्याशी बोलतो.” आपल्या बुद्धिमत्तेसाठी ओळखल्या जाणार्या जॅक मा यांच्या काही वक्तव्यांमुळे चीनी सरकार चिडले. दोन वर्षांपूर्वीच जॅक माने अलिबाबा सोडले, परंतु इनवेस्टर्सना अजूनही ते आवडतात. Tsai म्हणाले की,” जॅक खूप शक्तिशाली आहे यावर विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल. तो एक साधा व्यक्ती आहे. एप्रिलमध्ये अलिबाबाला प्रतिस्पर्धीविरोधी पद्धतींसाठी 2.8 अब्ज डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला.
अडचणीना मागे सोडले
Tsai म्हणाले, “आमच्या व्यवसायाचे काही रिस्ट्रक्चरिंग सुरु आहे. आम्हाला मोठा दंडही भरावा लागला आहे परंतु आम्ही त्या अडचणी मागे ठेवल्या आहेत आणि आता आम्ही पुढे पहात आहोत.” चीनमधील मानवाधिकारांच्या मुद्द्यांविषयी ते म्हणाले की,”लोकांचे जीवन सुधारत असल्याबद्दल मोठ्या संख्येने लोकं आनंदी आहेत.”‘
चीनी सरकारवर टीका करणे भोवले
गेल्या वर्षी जॅक मा यांनी चिनी अध्यक्षांवर टीका केली होती. तेव्हापासून मा यांचे वाईट दिवस सुरू झाले. चीनी सरकारच्या धोरणांवर टीका केल्यानंतर त्यांच्या कंपन्यांवर कडक कारवाई केली गेली. हळूहळू त्यांच्या कंपन्यांना लक्ष्य केले जाऊ लागले. पहिले Ant Group चा IPO रद्द झाला, त्यानंतर कंपनीचा व्यवसाय विकला गेला. यानंतरही बरेच नुकसान झाले. यामुळे जॅक मा यांची नेट वर्थ कमी झाली. हळूहळू, जॅक मा यांचे त्यांच्या Group वरील नियंत्रण संपुष्टात येत आहे. आता त्यांना त्यांचा हिस्सा विकायचा आहे.
24 ऑक्टोबर 2020 रोजी जॅक मा यांनी चीनच्या नोकरशाही प्रणालीवर टीका करणारे भाषण केले. त्यांनी चीनच्या वित्तीय नियामक (Financial Regulators) आणि सरकारी बँका (PSBs) चा तीव्र निषेध केला होता.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा