बेलवडे हनुमान सोसायटी निवडणुकीत ‘जय हनुमान विकास’ पॅनेल विजयी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथील बेलवडे हनुमान विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक शनिवार, दि. 5 रोजी पार पडली. अत्यंत संवेदनशील ठरलेल्या या निवडणुकीत जय हनुमान विकास पॅनेलने हनुमान सोसायटी बचाओ पॅनेलचा 13/0 असा पराभव केला. विजयानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.

बेलवडे बुद्रुकमधील सर्वाधिक जास्त सभासद असणाऱ्या या सोसायटीत एकूण 706 सभासद असून 423 जणांनी मतदान केले. या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले समर्थक हर्षवर्धन मोहिते संचालक कृष्णा बँक, ऍड. उदयसिंह पाटील – उंडाळकर समर्थक जयवंतराव मोहिते संचालक रयत साखर कारखाना व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण समर्थक शिवाजीराव मोहिते अध्यक्ष कराड दक्षिण सेवा दल काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान विकास पॅनेलने हनुमान सोसायटी बचाओ पॅनेलचा 13/0 ने पराभव केला.

राजकीय दृष्ट्या ,ह्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तसेच संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिलेलया या निवडणुकीत 13 जागा होत्या. त्या 13 जागांसाठी निवडणूक लढवण्यात आली होती. यामध्ये विजयी जय हनुमान विकास पॅनेलच्या दोन जागा बिनविरोध झाल्याने 11 जागेसाठी शनिवारी मतदान पार पडले. यामध्ये सर्व 13 जागा जिंकून जय हनुमान विकास पॅनेलने आपले वर्चस्व सिद्ध केले.

विजयी उमेदवारात जयवंतराव माणिकराव मोहिते, चित्रसेन मोहिते, शिवाजी पवार, अजित मस्कर (मोरे), धनंजय माने, उत्तमराव मोहिते, तानाजी मोहिते, संजय मोहिते, विजयमाला मोहिते, शालन मोहिते, मोहन कुंभार, पराग माने दिनकर वाघमारे यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. आर. मोरे यांनी काम पाहिले. निकालानंतर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गावातून आभार फेरी काढली.