मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील घाटकोपर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये का जैन मुनींनी मंदिराच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना गुरुवारी पहाटे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या मुनीचे नाव मनोहर लाल मुनी महाराज असे आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी तपासणी करून मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पंतनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी रात्री मुनींनी मंदिरात गळफास घेतला होता. गुरुवारी पहाटे हि गोष्ट उघडकीस आली. मनोहर लाल मुनी महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. ती सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे.
या सुसाईड नोट मध्ये महाराजांनी “माझ्या स्वप्नात माझे गुरू आले होते. त्यांनी मला सांगितले की, या पृथ्वीवरचे तुझ काम संपले आहे. तू आता परत ये” असे लिहिले होते. पोलिसांनी हि सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्याकडून देण्यात आली आहे.