Jaipur Mumbai Train Shooting | सोमवारी पहाटे जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत तब्बल चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा गोळीबार एक्स्प्रेसमध्येच असणाऱ्या आरपीएफ जवानाकडून करण्यात असून आता त्याला अटक करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, त्याच्या अटकेपूर्वी प्रवाशांसोबत जवानाचा वाद झाल्यामुळे त्याने गोळीबार केल्याची माहिती पोलीस आयुक्तांकडून देण्यात आली होती. मात्र आता या गोळीबाराचे मुख्य कारण उघडकीस आले आहे.
मानसिक स्थिती बिघडल्याने गोळीबार- Jaipur Mumbai Train Shooting
पश्चिम रेल्वे पोलीस आयुक्तांनी या घटनेची माहिती देताना सांगितले आहे की, आरपीएफ जवानाचा एक्स्प्रेसमधील प्रवाशांसोबत कोणताही वाद झाला नव्हता. तर त्याची मानसिक स्थिती स्थिरावलेली नव्हती. आरपीएफ जवान स्वतःवरील नियंत्रण गमवून बसल्यामुळे त्याने हा गोळीबार केला. यानंतर त्याने पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र त्याला पोलीसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. आता त्याच्यावर पुढील कारवाई प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
#WATCH उसकी(RPF कांस्टेबल चेतन कुमार) तबीयत गड़बड़ थी, उसके बाद उसने अपना आपा खो दिया…कोई बहस नहीं थी: मुंबई-जयपुर एक्सप्रेस गोलीबारी घटना पर पश्चिम रेलवे पुलिस आयुक्त, मुंबई pic.twitter.com/1Mo6UM2Q0U
— ANI_HindiNews (@AHindinews) July 31, 2023
प्रवासादरम्यान सर्वात अगोदर या जवानाने आपला वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरिक्षक टिकाराम यांच्यावर गोळ्या (Jaipur Mumbai Train Shooting) झाडल्या. यानंतर समोर आलेल्या प्रवाशांवर देखील आरपीएफ जवानाने गोळ्या झाडल्या. ही सर्व घटना जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये साडेपाचच्या सुमारास घडली. संबंधित आरपीएफ जवान चेतन कुमार एक्सप्रेस सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत होता. यादरम्यान त्याने चौघांवर गोळीबार केला. यामध्ये एएसआय टिकाराम मीना यांचा ही समावेश आहे.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. सध्या घटनास्थळी दाखल होऊन पोलीस घडलेल्या सर्व प्रकाराचा तपास घेत आहेत. तर मृत्यू झालेल्या चार जणांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून आरपीएफ जवान चेतन कुमार याला भाईंदर येथे अटक करण्यात आली आहे. चेतन कुमारच्या अटकेनंतर त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे उघडकीस आले आहे.