श्रीनगर ( जम्मू काश्मिर ) | लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जैश-ए- महम्मद हि दहशतवादी संघटना भारतातील अनंतनाग या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. २२ एप्रिल ते २५ एप्रिलच्या दरम्यान हा दहशतवादी हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. लष्कराच्या जवानांना आणि सामन्य नागtरिकांना या हल्ल्यात लक्ष केले जाण्याची शक्यता आहे अशी माहिती भारताच्या गुप्तचर विभागाने दिली आहे.
या आधीही एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात मतदान केंद्राना लक्ष करून दहशतवादी हल्ला करण्याचा जैश-ए- महम्मदचा इरादा होता. मात्र भारतीय लष्कर आणि कश्मीर पोलिसांच्या अभेद्य सुरक्षा व्यवस्थेमुळे दहशतवाद्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे.
दहशतवादी हल्ला घडवून मतदारांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जैश-ए- महम्मदकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने वाढत्या घुसखोरीला पायबंद घालण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्याच प्रमाणे कश्मीर मध्ये सुरक्षेचे मोठे उपाय केले जात आहेत.