जालना । विधवा सुनेच्या अनैतिक संबंधाला वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकल्याची घटना घडली. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चापडगाव शिवारत ही धक्कादायक घटना घडली.सासऱ्याने ही हत्या अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रियकराने मृत्यूपूर्वी आईला खरी हकिगत सांगितली आणि सासऱ्याचं पितळ उघड पडलं. या प्रकरणी सासरा आणि दुसऱ्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे (Widow Daughter In Law Murder).
भागवत प्रल्हाद हरबक आणि मारिया विनोद लालझरे अशी मृतांची नावं आहेत. मारियाच्या पतीने दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. भागवत हे लालबावटा संघटनेचे चापडगावचे अध्यक्ष होते. बुधवारी संघटनेचा कुंभारपिंपळगावला मेळावा होता. त्यामुळे भागवत आणि मारिया हे दोघे दुचाकीवर मेळाव्याला गेले. पण, दीड तासानंतर भागवतच्या दुचाकीचा अपघात झाला, अशी बातमी कुटुंबियांना समजली.
जखमी अवस्थेत भागवतला रुग्णालयात घेवून जाताना त्याने आईला सांगितले की विकास बथवेल लालझरे याने मुद्दामहून आमच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर मारियाचा रुग्णालयात नेतानाच मृत्यू झाला होता. भागवतच्या आईच्या तक्रारीवर मारियाचा सासरा बथवेल आणि मुलगा विकास यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही ताब्यात घेतलं आहे
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in