जळगाव : विद्यमान खासदाराचा भाजपला धक्का ; प्रचार न करण्याची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी |वाल्मिक जोशी

मी विद्यमान खासदार असल्याने मला उमेदवारी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील होतो . माझी उमेदवारी रद्द करून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली . त्यावेळेस पक्षाला पुनर्विचार करण्याचा सल्ला हि मी दिला .मात्र त्यानंतर उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि  माझ्या नावाचा अपप्रचार केला गेला असे ए.टी.पाटील म्हणाले आहेत.

सध्या माझे नाव वापरून अपप्रचार केला जातो  आहे. उन्मेष पाटील माझे मानस पुत्र आहेत वैगरे असे सांगण्याचा  केविलवाणा प्रयत्न काही जण करत आहेत असे  ए टी नाना पाटील म्हणाले .

उन्मेष पाटील यांचा प्रचार करण्याच्या काही वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत ज्यांनी माझा विषयी षडयंत्र रचले ते कुठल्या नाकाने मला प्रचारासाठी बोलावणार ? असा सवाल करत ए टी नाना पाटील यांनीया बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे म्हणले आहे. मी भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे यावेळी ए टी नाना पाटील म्हणले आहे.

संबंधित बातम्या 

जळगाव : विद्यमान खासदाराचा भाजपला धक्का ; प्रचार नकरण्याची घोषणा

गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांत उलटसुलत चर्चांना उधाण

 

Leave a Comment