जळगाव जिल्ह्यात आज 22 कोरोनाग्रस्तांची भर,  बाधितांची एकूण संख्या 232

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, रावेर, फैजपूर, चोपडा, अमळनेर, भडगाव, यावल येथील स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी 56 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर बावीस व्यक्तींचे तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एक, जळगाव शहरातील दर्शन कॉलनी दोन, गेंदालाल मील एक, पवननगर भागातील एक, चोपडा येथील सात, अडावद येथील एक, भडगाव शहर चार व निंभोरा येथील एक, फैजपूर एक, यावल एक आणि अमळनेर येथील दोन अशा एकूण बावीस रुग्णांचा समावेश आहे.

जळगाव जिह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 232 इतकी झाली असून त्यापैकी पस्तीस व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या तर अठ्ठावीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरीकांनी घाबरुन न जाता जागरुक रहावे लॉकडाउनचे पालन करावे , शक्यतो घराबाहेर पडू नये. अत्यंत आवश्यकता असेल तर बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करतांना सोशल डिस्टनिंगचे पालन करावे.

– अविनाश ढाकणे, जिल्ह्याधिकारी


Leave a Comment