जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 801 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 28933 झाली आहे. त्याच प्रमाणे 562 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 7272 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 20830 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 09 मृत्यू झाले असून आतापर्यंत एकूण 831 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 2938 पॉझिटीव्ह रुग्णांना होम आयसोलेशन ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर 193, जळगाव ग्रामीण 38, भुसावळ 69, अमळनेर 51, चोपडा 82, पाचोरा 8, भडगाव 6, धरणगाव 21, यावल 20, एरंडोल 128, जामनेर 52, रावेर 20, पारोळा 17, चाळीसगाव 54, मुक्ताईनगर 2, बोदवड 22 अशी रुग्ण संख्या आहे.
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 562 रूग्ण बरे झाले जिल्ह्यात आतापर्यंत 20830 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 7272 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 801 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 28933 झाली. आतापर्यंत 831 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ##WarAgainstVirus pic.twitter.com/sQB9tpuTAW
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) September 2, 2020