जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज 742 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 43301 झाली आहे. त्याच प्रमाणे 833 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 9885 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 32336 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 19 मृत्यू झाले असून आतापर्यंत एकूण 1080 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जवळपास 3355 पॉझिटीव्ह रुग्णांना होम आयसोलेशन ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे- जळगाव शहर 196, जळगाव ग्रामीण 10, भुसावळ 60, अमळनेर 56, चोपडा 58, पाचोरा 10, भडगाव 02, धरणगाव 43, यावल 21, एरंडोल 07, जामनेर 25, रावेर 23, पारोळा 125, चाळीसगाव 63, मुक्ताईनगर 18, बोदवड 24 अशी रुग्ण संख्या आहे.
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 833 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 32336 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 9885 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 742 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 43301 झाली. आतापर्यंत 1080 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला @JalgaonDM #COVID19 pic.twitter.com/w3JyV9E7oq
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) September 19, 2020