जळगाव जिल्ह्यात आज 13 कोरोनाग्रस्तांची भर, बाधितांची संख्या 331, आतापर्यंत 110 कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 88 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी 75 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील आठ, चोपडा येथील एक, यावल येथील एक,  तर जळगाव शहारातील शिवाजीनगर व इतर परिसरातील तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 331 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही वाढत जात असून ती काळ 300 पार गेली. त्यामुळे जिल्ह्यावासीयांच्या चिंतेत चांगलीच वाढ झाली आहे. दररोज जिल्ह्यातील अनेक तालुक्यात रुग्ण संख्या ही मिळतच आहे.

मात्र या बरोबरच जळगाव जिल्ह्यावासीयांसाठी आनंदाची गोष्ट आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांचे शतक झाले आहे. आतापर्यंत 110 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये 78 अमळनेरचे, भुसावळचे 9, जळगावचे 8, पाचोराचे 13 तर चोपडा व बाहेरील जिल्ह्यातील एका रुग्णांचा समावेश. मात करणाऱ्या रुग्णांमध्ये एक वर्षाच्या बालकापासून ते 70 वर्षाच्या महिलेचा समावेश आहे.


Leave a Comment