जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नवीन 44 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णाची संख्या आता 1001 इतकी झाली आहे. आतापर्यंत 113 मृत्यू व 429 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार हा जिल्ह्यात वाढत आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णाची वाढती आकडेवारी ही चिंताजनक बनत आहे. जळगाव व भुसावळ शहरांनी 200 च्या वर रुग्ण संख्येचा आकडा पार केला आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 83 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.
नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जळगाव जिल्ह्याची कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली होती. त्यात त्यांनी पुढील निर्देश जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. “जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. ही चिंतेची बाब आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने टास्क फोर्स गठित करुन त्यांचा सल्ला व औषधोपचार घ्यावेत. तसेच कोरोना विषाणूचा तपासणी अहवाल 24 तासांत प्राप्त होईल, असे नियोजन करावे,” असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
#जळगाव जिल्ह्यात आज नवीन 44 कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णाची संख्या 1001 इतकी झाली #stayhome #corona #lockdown @DDSahyadri @airnews_mumbai @abpmajhatv @zee24taasnews @JalgaonPolice @avinashdhakne
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) June 6, 2020