जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 245 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 11103 झाली आहे. आज दिवसभरात 270 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 7557 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 3028 रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 518 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर 86, जळगाव ग्रामीण 23, भुसावळ 08, अमळनेर 4, चोपडा 16, पाचोरा 18, भडगाव 7, धरणगाव 9, यावल 12, एरंडोल 5, जामनेर 14, रावेर 2, पारोळा 15, चाळीसगाव 28 अशी रूग्ण संख्या आहे. मुक्ताईनगर आणि बोदवड येथे आज एकही नवारूग्ण आढळला नाही.
कोविड-१९ विषाणू संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सींग, गर्दी टाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध इ. तरतुदींचे काटेकोर पणे अंमलबजावणीसाठी जळगाव जिल्ह्यात पथकांची स्थापना करण्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व शासनास सहकार्य करावे असे त्यांनी म्हंटले.
#जळगाव जिल्हा #कोरोना अपडेटस 31 जुलै @MiLOKMAT @SakalMediaNews @punyanagari @MarathiDivya @deshdoot @eJanshakti @Tarunbharatjal_ @Saamanaonline @LoksattaLive @mataonline @GulabraojiPatil @JalgaonDM@DDSahyadri @AIRJALGAON @abpmajhatv @TV9Marathi @News18lokmat @saamTVnews #COVID19 pic.twitter.com/FPwP0ROzzA
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) July 31, 2020
https://twitter.com/JalgaonDM/status/1289185661212225536?s=19