हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्यानंतर आता जळगाव महापालिकेत शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका दिला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली.
काही दिवसांपूर्वी सांगली महागनरपालिकेतही भाजपकडे पुरेसे संख्याबळ असूनही महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला होता. तर उपमहापौरपद काँग्रेसला मिळाले होते. त्यामुळे आता सांगलीपाठोपाठ महाविकासआघाडीने जळगावातही भाजपचा टप्प्यात आल्यावर अचूक कार्यक्रमक केल्याचे बोलले जात आहे.
जळगाव महापालिकेत भाजपचे ५७, शिवसेनेचे १५, एमआयएमचे तीन असे एकूण ७५ नगरसेवक आहेत. मात्र, ऐन निवडणुकीच्या आधी अंतर्गत राजकारणातून भाजपमध्ये फूट पडली होती. भाजपचे २७ नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यामुळं भाजपची कोंडी झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हांला 7972630753 या नंबरला Whatsapp करा आणि लिहा Hello News