जळगाव | राज्यात सर्वत्र शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाळ्यापूर्वी जमीन तयार करण्याची लगबग सुरु आहे. दरम्यान जळगाव येथील पाचोरा तालुक्यात जुन्ने शिवारात रवींद्र देशमुख यांच्या शेतात राजाराम सखाराम भिल्ल यांच्या बकऱ्या बसावण्यात आल्या होत्या. मात्र आज सोमवारी (12 एप्रिल )सकाळी 7 वाजता विद्युत लाईनची तार तुटून पडल्याने 32 बकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली आधीक माहिती अशी की, भिल्ल यांनी रवींद्र देशमुख यांच्या शेतात बकऱ्या बसवल्या होत्या. या बकऱ्यांच्या भोवती कंपाउंड घालण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अचानक जिवंत विद्युत वाहिनी तुटली आणि शेळ्या असलेल्या कंपाउंड वर पडली. त्यामुळे कंपाऊंडमध्ये बसलेल्या सर्व 32 बकऱ्या जागीच ठार झाल्या.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन व वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी बकऱ्यांचे शवविच्छेदन केले. राजाराम भिल्ल यांचा उदरनिर्वाह या बकऱ्यांवरच अवलंबून होता. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न आता त्यांच्यावर निर्माण झालाय. या घटनेमुळे त्यांचे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीने त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group