जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यात एका शुल्लक वादातून भरदिवसा एका इसमाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत पीडित व्यक्ती (burning man) 50 टक्के भाजला असून त्याच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालना शहरातील टाऊन हॉल भागात सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय घडले नेमके ?
मंडाळ नावाचा व्यक्ती इमारतीच्या वाहन पार्किंगमध्ये खुर्चीवर बसून तेथील कामगारांसोबत चर्चा करत होता. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या देशमुख नावाच्या व्यक्तीने मंडाळ यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून (burning man) दिले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी मंडाळ यांना लागलेली आग विझवली. आणि तातडीने त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले.
जालन्यात भरदिवसा एकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न , CCTV फुटेज आले समोर pic.twitter.com/B1NN6dPwyN
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 3, 2022
या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, इमरातीच्या तळमजल्यावर काही लहान मुलं खेळताना दिसत आहेत. ते खेळत असताना एक व्यक्ती धावत येते. या व्यक्तीला आग लागलेली असते. ही व्यक्ती (burning man) जीवाच्या आकांताने आग विझवण्याचा प्रयत्न करते. यासाठी ती व्यक्ती स्वत:चा शर्ट काढते. यावेळी दोन-तीन जण आग विझवण्यासाठी पुढे येतात. ते आग विझवण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यश मिळतं. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा :
IND vs SA T20 Series : 2 वर्षांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी BCCI ने बदलला ‘हा’ महत्वाचा नियम
‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार
पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका