शेतकरी पति-पत्नी गूळ निर्मितीतून दरवर्षी कमवतायत 12 लाखांची कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेतकरीसुद्धा आत्मनिर्भर बनत चालला आहे. अस्मानी-सुलतानी यासारख्या अनेक संकटाचा सामना हा शेतकर्‍यांना करावाच लागतो. संकटातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न काही शेतकरी करतात आणि जिद्द, मेहनतीच्या जोरावर शेतीतीतून व व्यवसायातून प्रगती साधतात. असाच प्रयत्न जालना येथील शेतकरी भगवानराव बोडखे यांनी केला. स्वता पिकवलेला ऊस कारखान्याला न घालता त्यांनी गुऱ्हाळ सुरु केले. आज ते वर्षाला 12 लाखांची कमाई करत आहेत.

शेती करत असताना त्याच्याशी निगडित असा जोड व्यवसाय केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळवता येते. आज शेतकरी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय, पशुपालन, फळ प्रक्रिया उद्योग, शेळीपालन असे अनेक व्यवसाय करतात. तुम्हाला व्यवसाय करताना, तसेच कृषी तज्ज्ञाची माशीही हवी असेल तर चिंता करू नका. Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये install करा. गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करावे. App ओपन होताच तुम्हालाशेतीशी निगडित अनेक गोष्टींबद्दल माहिती मिळेल. शेतीतून उत्पादन घेण्यासाठी असलेल्या व्यवसायाबद्दल व पिकासाठी सरकारकडून मिळत असलेल्या अनुदानाबाबत माहिती मिळेल. त्यासाठी Hello Krushi डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

jaggery

निर्मिती करण्याचा घेतला निर्णय

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या भगवानराव बोडखे आणि त्यांची पत्नी कविता या दोघांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून गूळ निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. शेतीचे आणि व्यावहारिक ज्ञान असल्याने ऊस लागवड करत ऊसापासून गूळ निर्मिती करण्याचे ठरवले.

Bhagwanrao Bodkhe

गुऱ्हाळातून करतात थेट ग्राहकांना विक्री

शेतात ऊसाचे उत्पादन घेत बोडखे दांपत्याने गुऱ्हाळ निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या उभारणीची तयारी सुरू केली. गुऱ्हाळासाठी लागणारी भट्टी, मोठी लोखंडी कढई, उसाच्या रसासाठी मशीन यांची जमवा जमव करून गुऱ्हाळ सुरू केले आणि सव्वा किलो व ५ किलो वजनाच्या गुळाच्या ढेपा तयार केल्या. सोबतच गुळाची काकवी तयार केली.

jaggery production

8 ते 10 जणांना रोजगार

आपल्या शेतातील उसापासून गुल, काकवी यांची निर्मिती करत या दाम्पत्यांनी गुऱ्हाळाच्या बाजूलाच रस्त्याकडेला त्याची विक्री सुरु केली. जालना -औरंगाबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता या सेंद्रीय गूळ आणि काकवीने भुरळ घातली आहे. आपल्या उत्पादनाचा खप वाढताच त्यांनी ८ ते १० लोकांना रोजगार देत गूळ व काकवी उत्पादन वाढवायला सुरुवात केली आहे.

jaggery production03

60 रुपये किलोनं सेंद्रिय गुळाची विक्री

भगवानराव बोडखे यांच्या गुऱ्हाळातील गूळ आणि काकवीला सध्या मोठी मागणी आहे. दिवसाकाठी जवळपास ६ क्विंटल गुळाची निर्मिती ते काढतात. तर एक किलो सेंद्रिय गूळ ६० रुपये किलो या भावाने विक्री करतात.

sugarcane

व्यवसायातून आर्थिक सुधारणा

भगवानराव बोडखे आणि कविता बोडखे यांनी गुऱ्हाळ सुरु केल्यानंतर आता रेणुकामाता गूळ उत्पादन प्रकल्पाकडून त्यांना आर्थिक स्थैर्य देखील मिळालं आहे. सेंद्रीय आणि रसायन विरहित खात्रीशीर गूळ निर्मिती होत असल्याने गूळ आणि काकवी खरेदी करण्यासाठी त्यांच्या शेताकडे ग्राहकांची व प्रवाशांची पावले हमखास वळतात.