म्हणून ‘त्या’ क्रिकेटरला ‘Gay’ नसल्याचे द्यावे लागले स्पष्टीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिडनी |यशाच्या अति उंच शिखरावर माणसे असल्याने त्यांच्या शारीरिक गरजाच्या बाबतीत एकादी माहिती समोर आली तर त्या  बद्दल मोठे गजब झाल्या सारखे समाज वागत असतो. अशाच पद्धतीचा प्रसंग ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू जेम्स फॉल्कनर याच्या बाबतीत घडला आहे.

रविवारी जेम्स फॉल्कनर हा समलिंगी (Gay) आहे काय? या चर्चेने सोशल मिडीयावर धुमाकूळ माजवला होता. शेवटी त्याला या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागले कि,  ‘मी समलिंगी नाही.’

फॉल्कनरने आपल्या वाढदिवसा निमित्त इंस्टावर एक पोस्टलिहली होती. त्या पोस्ट मध्ये त्याने लिहले होते कि मी वाढदिवस साजरा करण्यासाठी माझ्या आई आणि बॉयफ्रेंड सोबत आहे. मित्रा प्रति असणाऱ्या ओतीव प्रेमा पोटी त्याने अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्याचा मात्र सोशल मिडीयाने गैर अर्थ काढला. शेवटी त्याने जाहीर केले कि मी गे नाही. मात्र मला LGBT समुहा कडून मिळणारा पाठींबा पाहून आनंद झाला आहे.

 

Leave a Comment