श्रीनगर । जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ आणि अवंतीपोरा भागात शुक्रवारी भारतीय सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या दोन्ही ठिकाणी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी ८ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामधील ५ दहशतवादी शोपियाँमधील आणि ३ पंपोरमधील आहेत. आधीपासूनच या दोन्ही भागात सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू होती. जवानांच्या सतर्कतेमुळे शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी अवंतीपोरा जिल्ह्यातील पंपोर भागात ३ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर लगेचच सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली. पंपोरच्या मीज भागात मशिदीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांसोबत गुरुवारी दुपारी सुरक्षा दल यांच्यात चकमक उडाली अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली.
Two terrorists hiding in the mosque also neutralised by the operation party. With this, all three terrorists trapped at Meej, Pampore are neutralised. Further search of the area is on: DGP Dilbag Singh, J&K Police (file pic) pic.twitter.com/SrogZ0Yld1
— ANI (@ANI) June 19, 2020
दरम्यान, सुरक्षा दलाच्या जवानांची शोध मोहिम सुरुच ठेवली होती. त्यानंतर रात्रभर संघर्षानंतर शुक्रवारी सकाळी जवानांनी मशिदीत लपून बसलेल्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. याव्यतिरिक्त शोपियाँच्या मुनंद येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केले. या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. येथे आणखी दहशतवादी लपण्याची शक्यता आहे, असेही डीजीपी दिलबाग सिंग यांनी सांगितले.
#UPDATE One more terrorist has been eliminated by security forces in Munand area of Shopian district, Jammu and Kashmir. So far, five terrorists have been killed in the operation which is still underway: PRO Defence, Srinagar https://t.co/LX4AuqQXw1
— ANI (@ANI) June 19, 2020
गेल्या मंगळवारी शोपियाँमध्ये जवळपास दीड तास सुरू असलेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. सुरक्षा दलाच्या हाती लागलेल्या माहितीनंतर, या भागात शोध मोहिम राबविण्यात आली होती. याच दरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला. त्यावेळी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. हे तिघेही हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”