वृत्तसंथा । काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयन्त हाणून पाडत भारतीय लष्कराने ९ दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. आज रविवारी कुपवाड्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजिक ही कारवाई करण्यात आली. दुर्दैवानं या कारवाईत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर २ जवान जखमी झाले आहेत. या भागात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने जखमी जवानांचा बचाव करण्याच्या कामात मोठे अडथळे येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे लष्कराने केलेल्या कारवाईत ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर २४ तासांमध्ये एकूण ९ दहशतवादी ठार झाले आहेत. यांपैकी ४ दहशतवादी काल कुलगाम येथे मारले गेले होते. कुपवाडा येथे सुरू असलेल्या चकमकीचा आजचा पाचवा दिवस आहे. बुधवारी पाकिस्तानी दहशतवादी नियंत्रण रेषा पार करत भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते.
In this operation, 1 Indian Army soldier has been lost his life while 2 more are critically injured. Operations to evacuate the injured have been hampered by heavy snow and rough terrain conditions. Operation is still in progress: Army sources https://t.co/BKPo6NiVv9
— ANI (@ANI) April 5, 2020
खराब हवामान आणि जोरदार बर्फवृष्टीचा फायदा घेत हे दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते. हे दहशतवादी नियंत्रण रेषा पार करण्यातही यशस्वी झाले. बुधवारी दुपारीच भारतीय जवानांनी या दहशतवाद्यांना घेरले होते. त्यावेळी चकमक देखील झाली, मात्र, बर्फवृष्टी, दाट धुके आणि पावसाचा फायदा घेत हे दहशतवादी घेराव तोडून पळाले. त्यानंतर लष्कराने संपूर्ण भागाला घेरून शोध मोहीम हाती घेतली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६६१ वर, तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण?
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
सावधान! आज दिवे लावण्याआधी सॅनेटायझर वापरू नका, नाही तर..
पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला
राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत
अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम
उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..