जान्हवी कपूरने मुंबईत खरेदी केलं नवं घर; किंमत ऐकून व्हाल थक्क!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) कलाविश्वात आल्यानंतर, काही दिवसांतच स्वत:चं नवं घर खरेदी केलं आहे. जान्हवीचं नवं घर जुहू भागात असून ते एका बिल्डिंगच्या तीन फ्लोअरवर आहे. जान्हवी कपूरच्या या नव्या घराची किंमत ऐकून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, या घराची डिल तिने 39 कोटी रुपयांत केली आहे.

जान्हवीने 7 डिसेंबर रोजी या नव्या घराची डिल फायनल केली होती. जान्हवीने या घरासाठी 78 लाख रुपये स्टँम्प ड्यूटी भरली आहे. सध्या जान्हवी बहिण खुशी आणि वडील बोनी कपूर यांच्यासह लोखंडवालामध्ये राहते. जान्हवी कपूर आता केवळ 23 वर्षांची आहे. काही वर्षांपूर्वीच तिचं फिल्मी करियर सुरू झालं असताना, तिने केलेल्या इतक्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

जान्हवीने 2018 मध्ये धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता तिने गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल या चित्रपटात भूमिका साकारली होती. लॉकडाउन काळात नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झाला होता. जान्हवी आगामी ‘दोस्ताना 2’ आणि ‘रुही अफ्जाना’ या दोन चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी सध्या बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनसोबत गोव्यात व्हॅकेशनवर असून, दोघांचा गोव्यातील फोटो व्हायरल होतो आहे.जान्हवी सध्या बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनसोबत गोव्यात व्हॅकेशनवर असून, दोघांचा गोव्यातील फोटो व्हायरल होतो आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment