लेफ्टनंट च्या पोशाखातील जान्हवी कपूरचा हा फोटो होतोय व्हायरल

0
56
bbabbdbcbbebdd
bbabbdbcbbebdd
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फिल्मी दुनिया | आठ वर्षांपूर्वी झालेल्या कारगिर युद्धात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला लेफ्टनंट गुंजन सक्सेना (Gunjan Saxena) यांच्या जीवनपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. यामध्ये लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांची भूमिका अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) साकारत आहे. या सिनेमातील जान्हवीचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

कारगिल युद्धात फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या गुंजन या पहिल्या महिला ठरल्या होत्या. या युद्धात त्यांनी केलेली कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. हीच यशोगाथा सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.जान्हवी कपूरने या सिनेमाची जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी काही गोष्टी नवीन जान्हवी शिकत आहे. तर भूमिका चोख वठविण्यासाठी तिने गुंजन सक्सेना यांची प्रत्यक्ष भेटही घेतली आहे. पुढच्या वर्षी भेटीला येणाऱ्या या आगळ्या वेगळ्या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे.

गुंजन सक्सेना यांची शौर्यगाथा निर्मितीचे शिवधनुष्य निर्माता दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) उचलले आहे. यापूर्वी जान्हवी कपूरचा डेब्यू ‘धडक’ सिनेमा ही देखील करण जोहरची निर्मिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here