मुख्यमंत्री कर्फ्यू वाढवू शकतात- खासदार संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. आज संपूर्ण भारतात पंतप्रधान मोदींच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला राज्यासह देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कर्फ्यू वाढवू शकतात असे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी हे विधान केलं.

आजचा जनता कर्फ्यू हा ८ दिवसांपूर्वी लावायला पाहिजे होता असं मतही संजय राऊत यांनी व्यक्त केलं. लोकांना प्रेमानं आवाहन करून चालणार नाही. या देशाला कोरोनच्या महामारीतून वाचवण्यासाठी कठोरपणे कर्फ्यू वाढवण्याची गरज आहे असंही संजय राऊत म्हणाले. करोनाचा आकडा रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलावं लागेल. तेव्हा जीव वाचवण्यासाठी लोकांनी मानसिक तयारी करून एकप्रकारे देशसेवा करण्यासाठी लोकांनी प्रतिसाद देण्याची गरज आहे. करोनाच्या संकटाशी मुकाबला करताना सरकार अपयशी ठरते आहे याची संधीही विरोधी पक्ष शोधात आहे. मात्र, विरोधकांनी खुर्चीचा मोह सोडून सरकारला साथ देण्याचं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ६४ वरुन ७४ वर

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीने दिली थेट कोरोनाला धमकी, केला हा बोल्ड फोटो शेयर

धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास

लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!

सोळा दिवसांच्या उपचारानंतर ‍१३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात

Leave a Comment