जरंडेश्वर कारखान्याची उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार चाैकशी सुरू राहणार : किरीट सोमय्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जरंडेश्वर कारखाना सुरूच राहणार आहे. पाहिजे. शेतकरी, कामगार व वाहनधारकांना सांगतो हा कारखाना बंद पडणार नाही. कोणीही दहशतीचे वातावरण निर्माण करत असेल त्यांना सांगा. कोणतेही सरकार असो केंद्र की राज्य शेतकरी व मजदूर यांचे हित सुरूच राहिले पाहिजे. आपला लढा केवळ चुकीच्या पद्धतीने लिलाव झाल्या विरुद्ध आहे. कारखाना मूळ सभासदांना मिळाला पाहिजे. याबाबत उच्च न्यायालयाने लिलाव प्रक्रियेबाबत आदेश दिले असल्याचे, त्या पध्दतीने चाैकशी सुरू राहणार असल्याचे माजी खासदार भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.

कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर भाजप नेते किरीट सोमय्या आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते व कारखाना शेतकरी सभासदांनी त्यांना घेराव घातला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. बुधवारी दि. 6 रोजी सकाळी पाऊणे दहा वाजता जरंडेश्वर कारखान्यावर किरीट सोमय्या भाजप कार्यकर्त्यांसोबत पोहोचले. यावेळी कारखान्यावर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. सुरुवातीला जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व पदाधिकारी यांनी अजित पवार यांच्याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.

सोमय्या जरंडेश्वर कारखान्यावर; पोलिसांचा फौजफाटा

जरंडेश्वर साखर कारखाना विक्री घोटाळाप्रकरणी माहिती घेण्यासाठी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचे आज पहाटे साताऱ्यात आगमन झाले. सकाळी ते कारखान्यावर येणार असल्याने संपूर्ण कोरेगाव शहर व कारखान्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पहाटे 3 वाजता किरीट सोमय्या साताऱ्यात आल्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात मुक्कामी थांबले. सकाळी कार्यकर्त्यांना भेटल्यावर कोरेगावकडे रवाना झाले.