हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसी क्रिकेट World Cup 2023 पूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेला भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लवकरच पुनरागमन करणार आहे. येत्या ऑगस्टमध्ये आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या क्रिकेट सिरीजमध्ये बुमराह मैदानात खेळताना दिसू शकतो.
न्यूज 18 च्या वृत्तानुसार, सध्या बुमराहचा फिटनेस चांगला आहे. तो व्यवस्थित रिकव्हर होत आहे, जेव्हा तो मैदानात उतरेल तोपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल. ऑगस्ट मध्ये आयर्लंड विरुद्धच्या सिरीजसाठी तो चांगला आणि फिट वाटतोय. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. जसप्रीत बुमराह हा भारताच्या गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र आहे. अनेकवेळा त्याने आपल्या घातक यॉर्करने समोरच्या फलंदाजांची भंबेरी उडवल्याचे आपण बघितलं आहे. तसेच अनेकदा अटीतटीच्या सामन्यात त्याने टिच्चून गोलंदाजी करत भारतीय संघाला विजयही मिळवून दिला आहे.
अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये जाणवली बुमराहची कमी –
गेल्या सप्टेंबरपासून बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या बाहेर आहे. या काळात झालेल्या T २० विश्वचषक स्पर्धा, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, तसेच इंडियन प्रीमिअर लीग या सर्व महत्त्वाच्या स्पर्धाना त्याला मुकावं लागलं होत. बुमराह सारख्या गोलंदाजांची कमी भारतीय संघाला सुद्धा चांगलीच जाणवली. त्यामुळे यंदाच्या ५० षटकांच्या वर्ल्ड कपसाठी तरी बुमराह संघात परत यावा अशी इच्छा सर्व भारतीयांची होती. अखेर बुमराह फिट होण्याच्या मार्गावर असून लवकरच तो मैदानावर पुनरागमन करताना दिसेल.