यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी बुमराहच्या नावाची BCCI करू शकते शिफारस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचं नाव बीसीसीआय यंदा पाठवू शकते. दरवर्षी देशातील प्रत्येक क्रीडा संस्थेला दोन नावांची शिफारस करता येत. २०१९ साली बुमराहचं नाव चर्चेत होतं, मात्र रविंद्र जाडेजासोबतच्या शर्यतीत बुमरहाचं नाव मागे पडलं होतं. दरम्यान, आता पुन्हा यावर्षी बुमराहच नाव अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत आहे. गेल्या काही वर्षांमधली बुमराहची कामगिरीची दाखल घेत बीसीसीआयचे अधिकारी बुमराहच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बुमराहची कामगिरी अतिशय चांगली राहिलेली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १४ कसोटीत ६८ बळी, ६४ वन-डे सामन्यांत १०४ बळी आणि ५० टी-२० सामन्यात ५९ बळी अशी बुमराहची आतापर्यंतची कामगिरी राहिलेली आहे. काही दिवसांपूर्वी बुमराह आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता.

तर दुसरीकडे बीसीसीआयने यंदा अर्जुन पुरस्कारासाठी दोन खेळाडूंची नावं पाठवण्याचं ठरवल्यास सलामीवीर शिखर धवनचं नावही चर्चेत असल्याचं समजतंय. २०१८ सालच्या पुरस्कारासांठी धवनचं नाव बीसीसीआयने पाठवलं होतं, मात्र अंतिम यादीत त्याला स्थान मिळू शकलं नाही. २०१९ साली बीसीसीआयने बुमराह, रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी या ३ खेळाडूंच्या नावाची शिफारस केली होती, ज्यात अंतिम यादीत फक्त रविंद्र जाडेजाला स्थान मिळालं होतं.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”